मनोरंजन

आर माधवनचा लूक पाहून एका तरुणीने दिली लग्नाची ऑफर

अभिनेता आर माधवनचा हिंदी तसेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत मोठा चाहता वर्ग आहे. तरुणींमध्ये माधवनची क्रेझ फार आहे. चक्क माधवनला एका १८ वर्षीय तरुणीने लग्नाचा प्रस्ताव दिला आहे.

तिने लिहले की, मी १८ वर्षाची असून मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, यात काही चुकीचे आहे का? तिच्या या प्रश्नावर माधवनने अत्यंत शांतपणे उत्तर दिले. देव तुझे भले करो. तू माझ्यापेक्षा अधिक चांगल्या व्यक्तीला शोधू शकतेस, असे उत्तर माधवनने दिले आहे.

आर माधवन सध्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्‍ट’ चित्रपटात व्यस्त असून यातील नवाकोरा लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of