मनोरंजन

‘तारक मेहता’ मध्ये दया बेन पुन्हा करणार एंट्री

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत प्रेक्षकांमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या मालिकेत पुन्हा एन्ट्री करणार असल्याचा खुलासा जेठालालने नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

दिलीप जोशी म्हणजेच जेठा लाल यांनी डीएनएला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं, मला माहीत नाही पण काहीही होऊ शकते. दिशा तिच्या भूमिकेत परत येऊ शकते. मला अशा आहे की, ती परत येईल.

दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मॅटर्निटी लिव्हवर आहे. मागच्या बऱ्याच काळापासून ती परत येणार की नाही यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. तसेच तिनं शोमध्ये काम करण्यासाठी मानधनात वाढ केल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र तची ही मागणी निर्मात्यांनी अमान्य केली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of