क्रीडा मनोरंजन

त्यांच्या सारखा मला आदर का नाही..? अनुष्काने केला सवाल

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टीका केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना त्यांनी अनुष्का शर्माचा देखील उल्लेख केल्याने अनुष्का दुखावली आहे. तिने गावसकरांच्या या टीकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“सुनील गावसकर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुम्ही केलेलं वक्तव्य हे अत्यंत त्रासदायक असून एखाद्या क्रिकेटरच्या खराब कामगिरीसाठी तुम्ही त्याच्या पत्नीला दोषी कसं ठरवू शकता. तुम्ही तर कायम खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला आहे. मग हा आदर मला असावा असं तुम्हाला नाही वाटत का?” असा सवाल तिने गावसकरांना विचारला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of