मनोरंजन

दबंग-३ च्या अडचणीत वाढ, पुरातत्व विभागाकडून नोटीस

दोन भाग सुपरहिट झाल्यानंतर सलमान खान याने दबंगचा तिसरा भाग काढण्यास सुरुवात केली आहे.
‘दबंग-3 चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. मात्र, शूटिंग सुरु होऊन काही दिवशी झाले नाही तोपर्यंत चित्रपट अडचणीत सापडला आहे.

सलमान खानला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.एएसआयने सलमान खान आणि त्याच्या टीमला मध्यप्रदेशच्या मांडू येथील ऐतिहासिक जल महालात उभारण्यात आलेले दोन सेट हटवण्याचे आदेश दिले आहेत.

निर्मात्यांनी जर एएसआयचा आदेश मान्य केला नाही, तर सिनेमाचं चित्रीकरण रद्दही करण्यात येईल. अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of