मनोरंजन

नरेंद्र मोदींच्या चित्रपटात अमित शाह यांच्या भूमिकेत मनोज जोशी

पंतप्रधान नरेंद्रस मोदी याच्यावर आधारित बायोपिक सिनेमाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या पात्रांची निवड सुरू झाले आहे. मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय निभावणार असून दुसरे महत्त्वपूर्ण पात्र अर्थात अमित शाह यांच्या भूमिकेसाठी पात्र निश्चित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये भाजप अध्यक्ष अमित साह यांची भूमिका साकरण्यासाठी मनोज जोशी यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. मनोज जोशी भूलभुलैया, फिर हेराफेरी आणि हंगामा अशा चित्रपटात काम केले आहे.

दरम्यान  शाह यांच्या भूमिकेत मनोज जोशी यांना पाहिल्यानंतर ट्विटरवर विविध प्रतिक्रिया येत आहे. कुणी जोशीच्या भूमिकेला चांगले म्हटले की, तर अनेकांच्या मते अमित शाह यांच्या रोलसाठी सौरभ शुक्ला परफेक्ट आहे. सौरभ शुक्ला यांनी सत्यामध्ये कल्लू मामाची भूमिका केली होती.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of