मनोरंजन

बीग बींनी विचारला पबजीचा फुलफॉर्म

कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. या पर्वातील दुसरा एपिसोड झाला. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी समोर बसलेल्या स्पर्धकाला PUBG चा फुल फॉर्म विचारला.”मल्टीप्लेयर गेम PUBG चा फुल फॉर्म काय आहे?” असा प्रश्न अमिताभ यांनी विचारला. मात्र हा प्रश्न विचारल्यानंतर स्पर्धक थोडासा गोंधळून गेला. विशेष म्हणजे ‘पब जी’ या खेळाचं जरी लाखो लोकांना वेड लागलं असलं तरीदेखील त्याचा फुल फॉर्म फार कमी जणांना माहित आहे.

‘पब जी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गेमचा फुल फॉर्म ‘प्लेयर्स-अनक्नोन बॅटलग्राउंड’ (PlayerUnknown’s Battleground) असा आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of