मनोरंजन

वरुण धवनने गुपचुप केला साखरपुडा

बॉलिवूडचा  प्रसिध्द अभिनेता वरुण धवनने गेल्या वर्षीच गुपचुप साखरपुडा केला असल्याची माहिती आहे.  बालपणीची मैत्रीण नताशा दलाल आणि वरुण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण 2018 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला असल्याचे वृत्त समोर येत आहे.

देसी मार्टिन या वेबसाइटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वरुण धवननं गर्लफ्रेंड नताशासोबत साखरपुडा केला आहे. या दोघांच्याही नात्याला त्यांच्या कुटुंबीयांचीही मान्यता असल्यानं त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साखरपुडा उरकला असल्याचं या वेबसाइटनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण याची माहिती मीडियापर्यंत पोहोचू नये यासाठी त्यामुळे हा कार्यक्रम खूपच खासगी ठेवण्यात आला होता. या सेरेमनीमध्ये वरुण आणि नताशाच्या फॅमिली व्यतिरिक्त 1-2 जवळचे मित्रमैत्रिण उपस्थित होते. पण या सिक्रेट साखरपुड्याच्या बातमीत कितपत तथ्य आहे हे वरुण किंवा नताशाच्या प्रतिक्रियेनंतरच समजेल. मात्र या दोघांनीही यावर बोलणं टाळलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of