मनोरंजन

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी साराचे वजन होते 96 किलो !

अभिनेत्री सारा अली खानने खूप कमी दिवसांमध्येच बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये लोकप्रियता मिळविली आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान तिचा २४वा वाढदिवस साजरा करत आहे.

सारा अली खान फिट असून ती नियमित वर्कआउट करताना दिसते. पण सुरुवातीचा काळ असा नव्हता. एक वेळ अशी होती की साराचे वजन 96 किलो होते. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने स्वतःवर फार मेहनत घेतली. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, सारा अली खानने दीड वर्षात 20 किलो वजन कमी केले. यानंतर तिने डाएट आणि वर्कआउट नियमित सुरू ठेवलं. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटलं की, ‘स्वतःला शेपमध्ये ठेवण्यासाठी कथक, योग, पिलाटे आणि इंटेन्स वर्कआऊट करणं सुरू केले होते.

सारा लवकरच ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळतात. त्यानंतर सारा अभिनेता वरुण धवनसोबत ‘कूली नंबर १’च्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of