मुंबई – लॉकडाऊनच्या काळात पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सुदने मोठी मदत केली होती. त्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. यानंतर सोनू सूदच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं.
सोनू सूदच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत अखेर त्याने मौन सोडलं आहे. सोनू म्हणाला, “मी आत्ता माझ्या कामामध्ये बराच व्यस्त आहे. त्यामुळे आत्ता माझ्या आयुष्यावरील सिनेमाबाबत मी विचार केलेला नाही. आत्ताच माझ्या आयुष्यावर सिनेमा काढायचा म्हणजे थोडी घाई होईल. मला अजून बरंच काही करायचं आहे.”
दरम्यान, रिअल लाईफमध्ये गरजूच्या मदतीला धावणाऱ्या सुपरस्टारच्या सोनू सूदच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत त्यांच्या फॅन्सना प्रतीक्षा करावी लागणार आहे.