देश मनोरंजन

‘यामुळे’ सोशल मीडियावर होतेय तैमूर आणि प्रियंका गांधी यांची तुलना

नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यातच आता सोशल मीडियावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि तैमूर यांच्यात तुलना सुरू झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भाजपच्या महिला नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य ठरत आहे.

एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये भाजपच्या महिला खासदार पूनम महाजन यांनी तैमुर आणि प्रियंका गांधी यांची एकमेकांशी तुलना केली. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद झाला आहे. पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महाजन यांना प्रियंका यांची तुलना तैमूरसोबत केल्यानंतर राहुल गांधी यांना राफुल गांधी म्हटले. यावेळी महाजन यांना शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांना शकुनी मामा म्हटले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of