मनोरंजन

‘या’ छोट्याशा कारणामुळे येणार ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’चा सिक्वेल

‘या’ छोट्याशा कारणामुळे येणार ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’चा सिक्वेल

बॉलिवूडमध्ये जोया अख्तर वेगळ्या धाटनीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2011 मध्ये जोयाचा जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट आला होता. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.

चित्रपटात हृतीक रोशन, फरहान अख्तर, अभय दओल आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांमधून या चित्रपटाचा सिक्वेल बणविण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. यावर जोयाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जोया म्हणाली, की हृतिक रोशन याच्यासोबत काम करण्यासाठी माझा जीव चालला आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्साहित असते. त्याच्यासाठीच मी चित्रपटाचा सिक्वेल बनविण्यासाठी उत्सुक असल्याचे जोया म्हणाली. मात्र मला सध्या चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा असल्याचे जोयाने नमूद केलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of