गुन्हेगारी मनोरंजन मुंबई

‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…

मुंबई – सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर याप्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.अमली पदार्थाच्या मुद्द्यावर बॉलिवूडमध्ये वेगळीच दहशत पसरली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावे दिवसेंदिवस समोर येतआहेत. या बद्द्ल पुरावे मिळाल्यानंतरआता याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कंबर कसली आहे.

एनसीबीच्या एका निर्णयाने बॉलिवूडमधील अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण एनसीबीने एक अत्यंत हुशार आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला येथे पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. या मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आहे ”समीर वानखेडे”

समीर वानखेडे यांना अनेक मोठ्या केस सोपवण्यात येतात. ते अत्यंत हुशारीने केस हाताळतात. गेल्या २ वर्षात तब्बल १७ हजार कोटी रुपये ड्रग्ज आणि नशेचे रॅकेट त्यांच्या मार्गदर्शनाखाली समोर आले आहे. अत्यंत हुशारीने केसचे धागे-दोरे एकत्र करून त्याचा निकाल लावण्यात समीर वानखेडे ट्रेन आहेत. त्यांना मुंबई पोलिसातील सर्वात कडक अधिकारी मानले जाते.

समीर वानखेड़े मूळचे महाराष्ट्रातील असून ते २००८च्या बॅचचे भारतीय राजस्व सेवा आयआरएसचे अधिकारी आहेत. आयआरएसमध्ये आल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली होती. येथे डेप्युटी कमिश्नर म्हणून ते तैनात होते.

अत्यंत हुशार आणि शार्प असल्याने त्यांना आंध्रप्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतही काही केससाठी पाठविण्यात आले आहे. ड्रग्ज व नशा या संबंधित अललेल्या प्रकरणातील ते तज्ञ असल्याचे सांगण्यात येत आहे. समीर यांनी अनुराग कश्यप, विवेक ऑबेरॉय, रामगोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरात छापेमारी केली आहे.

२०१३ मध्ये त्यांनी गायक मिक्का सिंह याला मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह पकडल्यापासून ते चर्चेत आले होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of