मनोरंजन

येणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….

यंदाच्या वर्षी जरी ईदच्या मुहुर्तावर कोणता नवीन चित्रपट रिलीज झाला नसला, तरी २०२१ वर्षाची ईद मात्र धमाकेदार होण्याची शक्यता आहे. सलमान खानला टक्कर देण्याकरता जॉन अब्राहम मैदानात उतरला आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहुर्तावर जॉन अब्राहमचा चित्रपट ‘सत्यमेव जयते २’ रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

यासोबतच चित्रपटाचा पोस्टर देखील जारी करण्यात आला आहे. यात जॉनचा नवा अवतार चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

जॉन अब्राहम ने चित्रपटाचे पोस्टर शेयर करून सांगीतले की, ‘ज्या देशाची माता गंगा आहे, तीथे रक्त देखील तिरंगा आहे. #SatyamevJayate2 १२ मे ईद २०२१ ला’. जॉन आपल्या या नव्या लुक मध्ये खांद्यावर हल घेऊन ऊभा आहे. सत्यमेव जयते च्या पहिल्या भागासारखा पुढच्या वर्षी ईद वर येणारा सत्यमेव जयते २ हा देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरणार आहे.लॉकडाउन दरम्यान दिग्दर्शक मिलाप जावेरी सत्यमेव जयते २ च्या स्क्रिप्ट वर काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची शुटिंग पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. चित्रपटाचा पहिला पार्ट भ्रष्टाचार, राजनीति, इंडस्ट्रिलिस्ट्स आणि सामान्य माणसांच्या भोवतालच्या परिस्थितीवर बनवली होती. यावेळेस सत्यमेव जयते २ मध्ये काय नवीन असेल हे चित्रपट बघितल्यावरच कळेल.  दिग्दर्शक मिलाप यांनी सांगीतले की, चित्रपटाची शूटिंग लोकेशन आणि कथा मुंबई ते लखनऊ करण्यात आली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, या मुळे चित्रपटाच्या कॅनवास ला जास्त जागा मिळेल. सत्यमेव जयते २ चित्रपटात आधिपेक्षा दहा पट जास्त अॅक्शन आहे. यात जॉन अब्राहम सोबत दिव्या कुमार खोसला, मनोज वाजपेयी, नोरा फतेही आणि दया शंकर पांडे देखील दिसणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of