मनोरंजन

रिया चक्रवर्तीच्या समर्थनात बॉलीवुड सेलेब्स चा कँपेन..

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुख्य आरोपी मानलेल्या रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक करण्यात आली आणि तीला १४ दिवसांच्या न्यायिक कारावासाकरता पाठवण्यात आले. एनसीबीने रिया ला ड्रग्स सिंडिकेटचा एक अॅक्टिव सदस्य असल्याचे सांगितले. अशात रियाची समस्या आणखी जास्त वाढली आहे, पण बॉलीवुडचे अनेक सितारे रियाचे समर्थन करण्याकरता पुढे आल्याचे दिसून येत आहे.

रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक झल्याची चर्चा होत आहे, याशिवाय तीने जे टी शर्ट परीधान केले होते त्याने पण सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले होते. त्या टी शर्ट वर लिहीले होते, गुलाब लाल असतो, वॉयलेट्स नीळे असतात, आपण सर्व मिळून पितृसत्तेच्या या किल्ल्याला नष्ट करू. आता रिया च्या टी शर्ट वर लिहिलेला हा संदेश तीच्या समर्थनाचे माध्यम बनले आहे. बॉलीवुडच्या अनेक दिग्गज आणि प्रसिध्द व्यक्तींनी या उदाहरणाच्या माध्यमातून रियाला पाठिंबा दिला आणि तीच्या अटकेचा  विरोध केला.

अनुराग कश्यप, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, अमृता अरोड़ा, दिया मिर्जा, शिवानी दांडेकर, अंगद बेदी, राधिका मदन, श्वेता बच्चन अशा अनेक दिग्गजांनी सोशल मीडिया वर रीयाच्या टी शर्टवरील उदाहरणाच्या माध्यमातून रीयाच्या बाजूने सकारात्मक वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोशल मीडिया वर बॉलीवुड कडून #justiceforrhea आणि #SmashPatriarchy ट्रेंड करत आहे. दुसरीकडे सुशांत चे चाहतेपण सोशल मीडिया वर आपल्या अभिनेत्याच्या समर्थनात असल्याचे दिसत आहे. रिया च्या अटकेनंतर सगळ्यांना असे वाटत आहे की, सुशांत च्या गुन्हेगारांना आता शिक्षा होणार आणि त्याला न्याय मिळणार.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of