मनोरंजन

विकी कौशल झळकणार या चित्रपटात !

अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयामुळे अनेक दिग्दर्शकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक दिग्दर्शकांना त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. ‘LOL: लँड ऑफ लुंगी’ या हिंदी चित्रपटात कदाचित विकी कौशल झळकणार असल्याची चर्चा आहे.

हा चित्रपट ‘वीरम’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे. ‘पी.टी.आय’ला दिलेल्या एका मुलाखतीत फरहान सामजी म्हणाले की, “मी या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम करत आहे. ‘हाऊसफुल ४’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे काम सुरू होईल. हा चित्रपट मी दिग्दर्शित करेन की नाही हे अजून नक्की नाहिये.”

विकी कौशलने आतापर्यंत ‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे विकी चांगलाच चर्चेत आला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of