मनोरंजन

वीणा आणि शिव ‘या’ ठिकाणी करणार लग्न !

बिग बॉस मराठी सीझन-2 मधील स्पर्धेक वीणा आणि शिव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांची मैत्री हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे. आणि त्यांच्या नात्याबद्दल ते दोघे घरातही खूप उघडपणे बोलत असतात. त्यामुळे घराबाहेर आल्यानंतर ते दोघे लग्न करणार की नाही याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात मगंळवारी २७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. बिग बॉस २ मधील टॉप ६ सदस्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान विणा आणि शिवला ‘तुमचे हे नाते घराबाहेरही टिकणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वीणाने उत्तर दिले, ‘आमचे नाते हे केवळ शोपुरते मर्यादीत नाही. आम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आमच्या नात्याबद्दल घरी सांगणार आहोत. त्यानंतर आमच्या लग्नाची बोलणी होतील. त्यानंतर वीणाला लग्नसोहळा उल्हासनगमध्ये पार पडणार की विदर्भात असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वीणाने स्मित हास्य करत ‘आम्ही दोन्हीही ठिकाणी करु’ असे उत्तर दिले. वीणाच्या या खुलाश्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर ते दोघे खरंच लग्नाच्या बेडीत अडकणार का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of