मनोरंजन

शबाना आझमी यांना ‘या’ आजाराची लागण; रुग्णालयात दाखल

दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. खोकला आणि सर्दी झाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासण्यानंतर शबाना यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शबाना सध्या रुग्णालयात दाखल आहेत. मी सध्या रुग्णालयात दाखल असून माझ्या प्रकृतीत वेगाने सुधार होत आहे. तसेच मला यामुळे मोठा ब्रेक मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. शबाना 2017 मध्ये शेवटच्या मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. चित्रपटाचे नाव द ब्लॅक प्रिन्स असे होते. हा चित्रपट पंजाबी, इंग्लिश आणि हिंदी भाषेत होता.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of