Shraddha kapoor
मनोरंजन

श्रध्दा कपूर लढते ‘या’ गंभीर आजाराशी

अभिनेत्री श्रध्दा कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतेच तिचे सोहो आणि छिछोरे असे एकापाठोपाठ एक दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर बंपर कमाई केली. त्यामुळे श्रध्दा चांगलीच चर्चेत आहे. मात्र श्रध्दाने एका मुलाखती दरम्यान एक मोठा खुलासा केला आहे. मागच्या सहा वर्षापासून ती एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे तिने सांगितले आहे.

पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत श्रध्दाने सांगितले की, मागच्या 6 वर्षांपासून मी Physical Anxiety  ने आजारी आहे. मला ‘आशिकी 2′ नंतर या आजाराविषयी समजले. माझं संपूर्ण शरीर दुखत असे. त्यानंतर मला समजलं की मला Physical AAnxiety  आहे. आजही मी या आजाराशी झगडते आहे. मात्र मी हे स्विकारलं आहे की मला हा आजार आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा आता मला खूप कमी त्रास होतो.

पण आता मी यापासून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आहे. आपल्याला याचा स्वीकार करावाच लागतो की, आपण याचा एक भाग आहोत आणि या गोष्टीला आपल्याला प्रेमानेच हाताळावं लागतं. हाच मोठा फरक आहे’ असं ती म्हणाली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of