मनोरंजन

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने भाजपमध्ये प्रवेश केला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला. तसेच अर्थमंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. यावेळी ‘मोदी यांनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांना सत्ता मिळाली पाहिजे’ असे मत सनी याने व्यक्त केले.

माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपसोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपसोबत जोडलो गेलोय’ असेही सनी देओल म्हणाला. दरम्यान, पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर सनी देओल निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of