मनोरंजन

‘या’ अभिनेत्रीला दागिने विकून करावा लागतोय उदरनिर्वाह

प्रत्येकाला आयुष्यात अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागतो. सध्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नूपुर अलंकारवर देखील  दागिने विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने ‘पीएमसी बँके’ला २४ सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. सहा महिन्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बॅंकेच्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्यावर मर्यादा आणली आहे. आणि नूपुरचे खातेही याच बॅंकेत असल्यामुळे तिच्यावर ही परिस्थिती ओढविली असल्याचे ती म्हणते.

 

रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादताना लागू केलेल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून १,००० रुपये काढण्याची मर्यादा सुरुवातीला दिली होती. दोनच दिवसांत १०,००० रुपये करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात ती २५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली . ही मुभा बँकेवर निर्बंध असेपर्यंत, सहा महिन्यांसाठी लागू असेल. म्हणजे सहा महिन्यांत खात्यातून कमाल २५,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

नूपुर सध्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. तिच्या या कठिण प्रसंगी तिच्यावर ५० हजार रूपयांचे कर्ज झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखीत आपण आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचे तिने सांगितले आहे.

‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ शिवाय तिने ‘स्वरांगीनी’, ‘फुलवा’, ‘दिया और बाती हम’ यांसारख्या मालिकांमध्ये एकपेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of