मनोरंजन

कॅन्सरवर उपचार घेऊन ऋषी कपूर भारतात परतले

rishi kapoor

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर हे मागच्या एक वर्षापासून परदेशात कॅन्सरवर उपचार घेत होते. मात्र ऋषी कपूर आणि नितू कपूर भारतात परतले असून त्यांचा एअरपोर्ट वरचा व्हिडिओ जर्नालिस्ट विराल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

ऋषी कपूर मागच्या 1 वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडच्या कलाकारांनी त्यांची परदेशात जाऊन भेट देखील घेतली होती. बराच काळ आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. त्यांना घरची किती आठवण येत आहे हे त्यांच्या पोस्ट वरून दिसून येत असे. त्यामुळे मुंबईत परतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of