kaun banega crorepati
मनोरंजन

महिन्याला 1500 रुपये कमाविणाऱ्या बबिता झाल्या करोडपती

कौन बनेगा करोडपती हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच आता बिहारचे सनोज राजनं यांनी केबीसी 11 चा पहिला करोडपती होत इतिहास रचला तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या अमरावती येथे राहणाऱ्या बबिता टाडे या देखील या सीझनच्या दुसऱ्या करोडपती झाल्या आहेत.

बबिता या शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्याचं काम करतात. या कामातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नाही. फक्त दीड हजार रुपये इतका पगार त्यांना मिळतो. केबीसीच्या माध्यमातून एक सामान्य स्त्रीसुद्धा तिचं स्वप्न पूर्ण करू शकते हे बबिता यांना सिद्ध करायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of