मनोरंजन

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिच्यासोबत तिच्या मुलीला आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐश्वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तिला हलका ताप आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ऐश्वर्या आणि आराध्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं.

11 जुलैला रात्री बिग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. 12 जुलैला ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याला सुरुवातीला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. आता त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of