मनोरंजन

असं काय झाले की, रणवीरला ओरडली अनुष्का; पहा व्हिडिओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंग यांची मैत्री सगळ्यानांच माहिती आहे. मात्र नुकत्याच एका झालेल्या कार्यक्रमात अनुष्का रणवीरला ओरडली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चाहत्यांनी यासाठी अनुष्काला शाबासकी दिली आहे.

झाले असे की, रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही नुकतीच एल ब्युटी अवॉर्डला हजेरी लावली. या अवॉर्ड फंक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर स्टेजवर काहीतरी बोलताना दिसत आहे. रणवीर या ठिकाणी यशाचा अर्थ आणि प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे काय महत्त्व आहे यावर बोलताना दिसत आहे. अचानक तो स्टेजवरुन खाली उतरतो आणि हातात माइक घेऊन अनुष्काच्या समोर जातो आणि म्हणतो, ‘चला ब्यूटीफुल आणि टॅलेंटेड अनुष्का विचारुयात की तिच्यासाठी यशाचा अर्थ काय आहे.’ त्यावर अनुष्का म्हणते, ‘रणवीर तु होस्ट नाही आहेस.’ हे ऐकल्यावर रणवीर लगेचच तिथून निघून जातो आणि जाता जाता तो अनुष्काची माफी सुद्धा मागतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक चाहते अनुष्काच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. तिने रणवीरला ओरडले हे चांगलच केलं असं चाहत्यांचे म्हणणं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of