मनोरंजन

यामुळे आशा भोसले आणि लता दीदीं मध्ये झाला होता वाद

asha bhosle birthday

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. आशाताई यांनी अनेक एकसे बढकर एक गाणी गायली आहेत. त्यांनी जवळपास 16 हजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आज आम्ही तुम्हाला आशाताईंच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत.

आशाताईंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

आशाताईंच्या आयुष्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिका फार मोलाची होती. पण काही कारणांमुळे या दोघींच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. लता दीदींनी आशाताईंकडून जबाबदार वागणूकीची अपेक्षा केली खरी मात्र आशाताई लहानपणापासूनच फार वेगळ्या स्वभावाच्या होत्या. त्यांना स्वतःला नियमांमध्ये बांधून ठेवणं आवडत नसे. त्यामुळे त्यांनी आपला वेगळा रस्ता निवडला. वयाच्या 16 व्या वर्षीच आशाताईंनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी गणपतराव 31 वर्षांचे होते. फार कमी लोकांना माहित आहे की गणपतराव त्यावेळी लता दीदींचे सेक्रेटरी होते. गणपतराव भोसले आपल्या बहीणीसाठी योग्य नाहीत असे लता दीदींना वाटे.

एका मुलाखतीत आशाताईंनी सांगितलं, लतादीदींना अशाताई आणि गणपतरावांचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोन्ही बहीणींमध्ये दुरावा आला. यामुळे बरेच दिवस या दोघीही एकमेकींशी बोलत नव्हत्या. आशाताईंनीही त्यावेळी माहेरच्यांशी सर्व संबंध तोडले. आणि त्यांनी आपल्या संसाराला सुरुवात केली. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. त्यांना तीन मुले होती. आशाताई आणि गणपतराव विभक्त झाल्यानंतर देखील बहिणींच्या नात्यात गोडवा कधी आलाच नाही.

त्यानंतर आशा ताईंनी आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केले. १९८० साली हे दोन संगीत प्रेमी विवाह बंधनात अडकले. काही दिवसांनंतर मात्र बर्मन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आशा ताई पुन्हा एकट्या पडल्या. पण त्यांनी हिम्मत कधी हारली नाही, आणि आयुष्यात नवं यश मिळवत गेल्या.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of