मनोरंजन

‘त्या’ बातम्यांवरुन अमिताभ बच्चन संतापले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला असल्याच्या अनेक खोट्या बातम्या आणि अफवा काही वेळापासून पसरविल्या जात होत्या. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं ट्वीट बिग बींनी केलं आहे.

सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत.  अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, दरम्याने हे वृत्त खोटे असल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

 

बिग बींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 11 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यापाठोपाठ अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांना 11 जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी पसरली होती. त्यावर बिग बींनी ट्विट केलं, ‘ती बातमी चुकीची, बेजबाबदार, फेक आणि खोटी आहे.’

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of