मनोरंजन

‘स्वागत नही करोगे हमारा’, सलमानच्या दंबग-3 ची पहिली झलक

Dabangg 3 Poster

सलमान खानच्या दंबग-3 या चित्रपटांची चांगलीच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली आहे. सलमानच्या बहुचर्चित दबंग 3 चं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून यासोबतच या सिनेमाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.

सलमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दबंग – ३ चा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान नेहमीप्रमाणेच अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. या मोशन पोस्टरच्या खाली त्याने ‘स्वागत तो करो हमारा!’ हे दबंग मालिकेतले लोकप्रिय वाक्य लिहिले आहे.

‘दबंग 3’ या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून सिनेमात सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा आणि मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर स्क्रिन शेअर करणार आहे. सोनाक्षीचा लुक रिलीज झाला असला तरीही सईचा लुक मात्र अद्याप समोर आलेला नाही. ती या सिनेमात सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका साकरत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of