मनोरंजन

दिशा पटानीचे फिटनेसचे रहस्य काय ? या आहेत टीप्स

अभिनेत्री दिशा पटानीकडे पाहून तिच्या चाहत्यांना नेहमी प्रश्न पडतो की, तिच्या फिटनेसचे रहस्य काय आहे. जर तरुणींना तिच्यासारखी फिगर करायची असेल तर तुम्ही देखील दिशाच्या फिटनेस टीप्स फॉलो करा.

स्वतःला फिट ठेवण्यासाठी दिशा नियमित व्यायाम करते. याशिवाय ती एक हेल्दी डाएट प्लान सुद्धा फॉलो करते. पण दिशा तिच्या अ‍ॅब्जबद्दल खूप जागरूक आहे आणि ते मेंटेन करण्यासाठी दिशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करते.

दिशाचा डाएट प्लानसुद्धा प्रोटीन आणि विटामिन्सनी परिपूर्ण असतो. ब्रेकफास्टमध्ये ती रोज 2-3 अंडी, टोस्ट दूध किंवा ज्यूस घेते. तर लंच आणि डिनरमध्ये ताजी फळं, ज्यूस, हिरव्या भाज्यांचे सलाड, ब्राऊन राइस आणि डाळ याचा समावेश असतो. तसेच मधल्या वेळचं खाणं म्हणून ती बदाम किंवा शेंगदाणे खाते.

दिशाच्या लंचमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ असतात. यात तिला चिकन आणि राइस खाणं आवडतं. याशिवाय कधी कधी ती उकडलेली अंडी सुद्धा खाते. तसेच बॉडी हायड्रेट करण्यासाठी ती भरपूर पाणी पिते. दिशा आठवड्यातून 4 दिवस आणि प्रत्येक दिवसातून 2 वेळा जिमला जाते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of