मनोरंजन

प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास; रुग्णालयात दाखल

बॉलिवूड मधील प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंकविलाच्या अहवालानुसार श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे सरोज खान यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या 71 वर्षांच्या आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

दरम्यान सध्या सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of