मनोरंजन

‘या’ ज्येष्ठ निर्मात्याचे मुंबईत निधन

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ निर्माते हरीश शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Indianexpress.com शी बोलताना त्यांचे बंधू विनोद शाह यांनी अशी माहिती दिली की, ‘हरीश घशाच्या कॅन्सरशी गेल्या 10 वर्षांपासून लढा देत होता. आज 1 वाजण्याच्या सुमारात त्याचे अंत्यसंस्कार पवन हन्स याठिकाणी पार पडतील.

हरीश शाह ‘दिल और मोहब्बत’, ‘मेरे जीवन साथी’, ‘काला सोना’, ‘धन दौलत’ ‘राम तेरे कितने नाम’, ‘होटल’, ‘जाल – द ट्रॅप’  यांसारख्या तब्बल 9 चित्रपटांचे निर्माते होते. सन्नी देओल स्टारर 2003 मध्ये त्यांनी बनवलेला ”जाल – द ट्रॅप’ चित्रपट शाह यांचा शेवटचा सिनेमा होता.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of