मनोरंजन

बॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे जयपूरमध्ये निधन झाले आहे. किडनीच्या समस्येमुळे त्यांचं निधन झाल्याचं समजतं आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे रजत मुखर्जी हे त्यांच्या गावी जयपूर येथे गेले होते. परंतु, या काळात मूत्रपिंडासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्यामुळे त्यांना एप्रिलमध्येच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यानंतर मे महिन्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, अखेर १८ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘प्यार तूने क्या किया’, ‘रोड’, ‘लव इन नेपाल’, ‘उम्मीद’ या सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of