मनोरंजन

माफिया क्वीनचा फस्ट लूक रिलीज, आलिया नव्या रुपात !

अभिनेत्री आलिया भट तिचा आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील आलिया भटचा फस्ट लूक रिलीज झाला आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ मुंबईतील माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेत्री आलिया भट या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. येथे आल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. त्या येथील महिलांना आर्थिक मदत करतात, त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठीही लढा देतात. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

आलियानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात ती दोन वेण्या घातलेल्या एका नुकत्याच वयात आलेल्या मुलीच्या वेशात दिसत आहे. याशिवाय तिच्या बाजूच्या टेबलवर बंदूकही दिसत आहे. आलियाचा हा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of