मनोरंजन

चित्रपट निर्मात्याची 27 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

हॉलिवूड चित्रपट निर्माते स्टीव्ह बिंग यांनी 27 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशी माहिती मिळते आहे की कोरोनामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. याठिकाणी नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

55 वर्षीय स्टीव्ह गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्येमध्ये होते. दरम्यान त्यांना करोना विषाणूमुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र या आयसोलेशनमुळे त्यांच्या नैराश्यात आणखी वाढ झाली आहे. परिणामी त्यांनी सोमवारी रात्री लॉस एंजलिसमधील अपार्टमेंटच्या 27 व्या मजल्यावरून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.

सोमवारी 2 वाजता लॉस एंजिन्सच्या सेंच्युरी सिटीमधील एका लक्झरी अपार्टमेंटमधून 27 व्या मजल्यावरून त्यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर चाहते श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of