मनोरंजन

कपिल शर्माच्या नन्ही परीचा पहिला फोटो झाला व्हायरल

संपूर्ण देशाला पोट धरुन हसविणाऱ्या कॉमेडीयन कपिल शर्माच्या नन्ही परीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पडत आहे.

कपीलने आपल्या मुलीचे नाव ‘अनायरा’ असे ठेवले आहे. “भेटा माझ्या काळजाच्या तुकड्याला” अशा आशयाचे ट्विट करुन त्याने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात हजारो नेटकऱ्यांनी कपीलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोडंस मुलीला जन्म दिला आहे. त्याने ट्विट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. तसेच त्याने त्यासोबत आपल्या मुलीचा पहिला फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of