मनोरंजन

करीना कपूर करते आता शेतात काम

अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये करीना चक्क हातात कुदळ आणि फावडे घेऊन शेतात काम करताना दिसत आहे.

करीनाचा हा व्हिडिओ तिने फॅनपेजवर शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये करीना कपूरचा अनोखा अंदाजही बघायला मिळतो आहे. स्वतः करीनाने या व्हिडीओबाबत काहीही खुलासा केलेला नाही. तिच्या आगामी प्रोजेक्‍टबाबत काही सरप्राईज या व्हिडीओमधून तिला द्यायचे असणार हे नक्की आहे.

या व्हिडीओमध्ये करीना हातात कुदळ आणि फावडे घेऊन शेतामध्ये काम करताना दिसते आहे. तिला कुदळ आणि फावड्याचे वजनही पेलवत नव्हते. तरीही नेटाने ती माती उकरण्याचा खटाटोप करताना दिसते आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of