मनोरंजन

‘मिमी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिचा आगामी सिनेमा ‘मिमी’ मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा सरोगसीवर आधारित आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लुक पोस्टरवर  दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यातल्या एका हातात बाळ असून दुसरा हात हे बाळ घेण्यासाठी पुढे केलेला दिसत आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यामध्ये एका हातामध्ये बाळ झोपलं असून त्याला घेण्यासाठी दुसरा हात पुढे सरसावताना दिसत आहे. हे पोस्टर क्रितीने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. “आयुष्यातला असा प्रवास जो अशक्य अशा चमत्कारीक गोष्टींनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. ‘मिमी’ हा खूप खास असणार आहे”, असं कॅप्शन तिने या पोस्टरला दिलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of