मनोरंजन

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अमोल कोल्हे भावूक, पाहा व्हिडिओ

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका लवकरच आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

या मालिकेचा शेवट अत्यंत रंजक असणार आहे. दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक जोरदार तयारी करत आहेत. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते.

या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रूपेरी पडद्यावर आणण्याचं काम अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. संभाजी महाराजांचा संपुर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न कोल्हे यांनी केला. आता मालिका संपत आली असताना अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडीओ ट्विट करत एक प्रवास कधीच न विसरता येणारा……, असं कॅप्शन दिलं आहे.

सुरू झालेला प्रत्येक प्रवास कधीना कधी संपणार हे निश्चितच असतं. काही प्रवास मात्र खुप काही देऊन जातात. खुप काही शिकवतात. कर्तव्यपुर्तीची अनुभुती आणि स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात. असाच एक प्रवास काळजाच्या कप्यात जपून ठेवण्यासारखा छत्रपती संभाजी महाराजांची गाथा…….. स्वराज्यरक्षक संभाजी, असं व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे बोलत आहेत.

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of