मनोरंजन

राणू मंडल यांच ‘तेरी मेरी’ गाणं प्रदर्शित

ranu mondal song, teri meri kahani

सोशल मीडियावर आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका राणू मंडल यांच ‘तेरी मेरी कहाणी’ हे पहिलं गाण आज प्रदर्शित झाले आहे.

रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं त्यांना त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हिमेशच्या स्टुडिओमधील रानू यांचा व्हिडीओ सुद्धा सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांचं गाणं ‘तेरी मेरी काहानी’ आज प्रदर्शित झाले आहे.

या गाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याला उत्तम कलाटणी मिळाली आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेलं रानू मंडल आणि हिमेशचं हे गाणं सध्या चांगलचं व्हायरल होत आहे. तसेच रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of