मनोरंजन

रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातील ‘हा’ डान्स व्हिडिओ पाहिलात का?

अभिनेता रितेश आणि जेनेलिया यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला आज (3 जानेवारी) 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. याच आठवणींना उजाळा देणारा या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातील एक गाणं रिक्रिएट करत लातूरमधील बाभूळगाव येथील एका शेतात या दोघांनी बेधुंद होत रोमॅण्टीक अंदाजात डान्स केला. दोघांचा हा डान्स पाहून चाहते अक्षरशः या दोघांवर फीदा झाले आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची भेट झाली आणि नंतर ते विवाहबंधनात अडकले. रितेशचा हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of