मनोरंजन

अरेरे ! जेनेलियाने रितेशला घासायला लावले भांडे; पाहा व्हिडिओ

सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. चित्रपटांचे शुटींगही रद्द करण्यात आल्यामुळे सगळे सेलिब्रेटी सध्या घरीच आहेत. अशावेळी सेलिब्रेटी आपले छंद जोपासताना दिसत आहेत. काही जण घरातली काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

रितेशचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. अभिनेता अजय देवगनचा आज वाढदिवस आहे. अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हा व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे. मात्र गंमतीशीर बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये रितेशची पत्नी जेनेलिया त्याच्याकडून चक्क भांडी घासून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला अजय देवगनच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील ‘मौका मिलेगा तो हम बता देंगे’ हे गाणे वाजत आहे.

 

रितेशचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of