मनोरंजन

Video: बीग बॉसच्या घरात जाऊन सलमानने घासले भांडे, केले टॉयलेट साफ

बिग बॉस 13 चे पर्व सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. या आठवड्यात शहनाज गिलला कॅप्टन्सी मिळाली होती. तेव्हा घरातील सदस्य तिचे ऐकत नव्हते आणि घरातली कामे देखील करत नव्हते. शहनाजला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन काम टाळत होते. हा सगळा प्रकार पाहून सलमान खानला राग आला. आणि त्याने चक्क घरात जाऊन भांडी घासली आणि टॉयलेट देखील स्वच्छ केले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत सलमान खान किचनपासून बाथरुमपर्यंत बिग बॉसचं घर स्वच्छ करताना दिसत आहे. घरातील सर्व स्पर्धक एका कॅमेऱ्यासमोर उपस्थित आहेत तर सलमान घरात जाऊन साफसफाई करत आहे. सलमान हे काम करत असताना घरातील स्पर्धक त्याच्याशी माफी मागत आहेत. चक्क सलमान हे सर्व काम करत असताना पाहून स्पर्धकांना ओशाळल्यासारखं झालं. आता यापुढे बिग बॉसच्या घरात अजून काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कलर्स टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of