मनोरंजन

सुनिधी चौहानचा मुलगा देतोय तिला गाण्यात साथ; पाहा व्हिडिओ

गायिका सुनिधी चौहान सध्या सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने नुकताच तिच्या मुलासोबत गाणे गातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुनिधीचा मुलगा खूप मधूर आवाजात गाणे गाताना दिसत आहे.

सुनिधी चौहाननं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती ‘कटते नहीं कटती…’ हे मिस्टर इंडिया या सिनेमातील गाणं गाताना दिसत आहे आणि तिचा लहान मुलगा तिला या गाण्यात साथ देताना दिसत आहे. सुनिधी प्रमाणंच तिचा मुलाचा आवाजही खूप गोड आहे आणि जेव्हा तो बोबड्या बोलांमध्ये गातो तेव्हा ते अधिकच गोड वाटतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप आवडीने पाहिला जात आहे.

View this post on Instagram

Our first duet! #tegh

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5) on

सुनिधीने २०१२ मध्ये संगित दिग्दर्शक हितेश सोनिकशी लग्न केले. हे सुनिधीचे दुसरे लग्न आहे. हितेशने ‘रुकी रुकी’, ‘डांस पे चांस’, ‘कमली’, ‘दर्खास्त’, ‘मैं बनी तेरी राधा’ ही हिट गाणी दिली होती. त्यानंतर २०१८ मध्ये सुनिधीला मुलगा झाला.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of