मनोरंजन

म्हणून सलमानला वन बीएचके फ्लॅटमध्ये राहायला आवडते

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमाख खान नेहमीच त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. तो कितीही श्रीमंत असला तरी त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. तो बंगल्यात राहण्याऐवजी वनबीएचके फ्लॅट मध्ये का राहतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमी पडलेला होता. मात्र खुद्द सलमाननेच एका मुलाखती दरम्यान याचे उत्तर दिले आहे.

एका चॅट शो ला सलमानची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला तु फ्लॅट मध्ये का राहतो ? त्यावर तो म्हणाला मला माझ्या आई वडिलांसोबत राहायला आवडते. एखाद्या अलिशान बंगल्यापेक्षा मला त्यांच्यासोबत राहायला मिळते हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. आम्ही या फ्लॅट मध्ये लहानपणांपासून राहतो. त्यामुळे मला हे घर सोडून कुठे दुसरीकडे राहायला जायची इच्छा होत नाही असे देखील सलमान खान म्हणतो.

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर घर आहे. या घरात सलमानचे वडिल सलीम खान आणि सलमा खान राहतात. हे घर छोटे असले तरी सलमानच्या कित्येक आठवणी या घराशी जोडलेल्या आहेत. सलमानचा पनवेल येथे मोठा फार्म हाऊस देखील आहे. मात्र सलमान सेलिब्रेशनसाठी तेथे जाताना दिसतो.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of