मनोरंजन

धक्कादायक; Tiktok स्टार सिया कक्कडची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर त्याचे चाहते अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. ही घटना ताजी असतानाच 16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

टिकटॉक स्टारच्या मॅनेजर अर्जुन सरीननं सांगितलं की, बुधवारी रात्री एका व्हिडिओच्या कोल्याबरेशनवरून सियाशी त्याचं बोलणं झालं होतं. यावेळी सिया अगदी व्यवस्थीत बोलत होती. ती आत्महत्या करेल असं, वाटत नव्हतं. मात्र, त्यानंतर अचानक तिच्या आत्महत्येचं वृत्त समजलं.

सिया हिने आत्महत्या करण्यापूर्वी 19 तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सियाने तिच्या एका स्टोरीत डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसं पाहिलं तर तिनं हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पाच दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. सियाचे इंस्टाग्रामवर 91 हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of