मनोरंजन

प्रिती झिंटा म्हणते, या गायीकडून शिकावे वाहतूकीचे नियम

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. मात्र तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ माणसाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रिती म्हणते प्राण्यांपासून माणसाने काही तरी शिकले पाहिजे. त्यांना कळतं पण आपल्याला कळत नाही. प्रितीने एका गाईचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही गाय वाहतुकीचे नियम पाळताना दिसत आहे. ही गाय रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण जेव्हा लाल दिवा लागतो तेव्हा ती इतर वाहनांप्रमाणे स्वतः उभी राहते. प्रितीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ‘आता या गायीकडे बघून वाहतूकीचे नियम कसे पाळले जातात ते शिका. त्यामुळे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of