मनोरंजन

प्रियांकाच्या ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर रिलीज

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांच्या आगामी सिनेमा ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमाची सुरुवातीपासूनच चर्चा झाली आहे.

हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आदिती नावाची व्यक्तीरेखा साकारात आहे, तर फरहान तिच्या पतीच्या भुमिकेत आहे. हा चित्रपट मोटिवेशन स्पिकर आयेशा चौधरीची बायोग्राफी ‘माय लिटिल एपिफेनीज’वर आधारित आहे. झायरा वसीम या चित्रपटात फरहान आणि प्रियंकाची मुलगी आयेशा भूमिकेत आहे. आंकठ प्रेमात बुडालेल्या नवरा-बायकोला आयेशा नावाची मुलगी असते. मात्र नंतर आयेशाला गंभीर आजाराने ग्रासले जाते. नवरा-बायकोचे प्रेम, मुलीच्या आजारपणाचा संघर्ष आणि आनंदात आयुष्य कसे जगावे या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये दाखवल्या आहेत.

या सिनेमा साठी प्रियांकानं सलमान खानचा ‘भारत’ सिनेमा नाकारल्याचं सर्वांनाच माहीत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालं. त्यानंतर आता नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of