चीनमध्ये पुरातत्व संशोधकांना शिझियांग प्रांतात तब्बल ८००० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. प्रांतातील युआओ नावाच्या शहरात एका कारखान्याची उभारणी सुरु असताना सापडले आहेत.
चीनमधील संस्कृती ८००० वर्षाची जुनी आहे असे आतापर्यंत मानले जात होते. पण या नवीन पुराव्यांमुळे हि संस्कृती किमान ७३०० ते ८३०० वर्ष जुनी असावी असा नवीन निष्कर्ष आता काढण्यात येत आहे.
पुरातत्व संशोधकांनि दिलेल्या माहितीप्रमाणे, जमिनीच्या खाली ५ ते १० मीटर खोल ८००० चौरस मीटर क्षेत्रात हि नवीन साईट साईट आहे. या साईटवर उत्खनन सुरु असताना तेथे मातीची भांडी,शस्त्रे, हाडे, लाकडाच्या वस्तू आणि काही प्राण्यांचे अवशेष मिळाले आहेत.
उत्खनन करणाऱ्या गटाचे नेते सुन गुओपिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या ठिकाणी हि संस्कृती किमान ५०० वर्षे अस्तित्वात होती. या उत्खनन मोहोमेमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा केली जात आहे.