देश विदेश

कुलभूषण यांना मिळणार राजनैतिक मदत

भारत देशाचे नागरिक कुलभूषण जाधव हे सध्या शत्रू राष्ट्र पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्याच्या मुक्ततेसाठी हे प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) कडे होते. आता न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानंतर आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे.

‘आयसीजे’ने भारताच्या बाजूने निकाल दिला. आता या निर्णयाच्या २४ तास तासांनंतरच पाकिस्तानने त्यांना आमच्या देशातील कायद्यानुसार भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देऊ आणि त्या प्रक्रियेवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली.

यापूर्वी भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र पाकिस्तानने १६ वेळा भारताची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यानंतर न्यायालयाने भारताच्या बाजूने निर्णय दिला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of