देश विदेश

…तरी भारत इराणचा सच्चा मित्र -चेगिनी

नवी दिल्ली – सध्या भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली असला तरी भारत हा इराणचा सच्चा मित्र आहे, असे विधान इराणचे भारतातील राजदूत अली चेगिनी यांनी केले आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात थांबवली आहे. त्यातच भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी भारताला तेलाची कमतरता भासू देणार नाही त्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर इराणच्या राजदूतांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण आहे. माइक पॉम्पियो यांच्या बरोबरच्या भेटीचा दाखला देऊन चेगेनी म्हणाले की, तेलाची किंमत, उपलब्धता आणि सुरक्षेविषयी बोलत असतील तर इराण भारताच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकतो. भारताने तेल आयात थांबवली असली तरी कोणतेही नकारात्मक संकेत दिलेले नाहीत असे चेगेनी यांनी सांगितले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of