विदेश

पाकला धक्का; एफएटीएफने टाकले ब्लॅकलिस्टमध्ये

टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपने (APG) पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले आहे. एफएटीएफने याआधी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा  करणे न थांबवल्याने एफएटीएफने ही कारवाई केली आहे.

दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा झटका आहे. एफएटीएफने टेरर फंडिंग रोखण्यासाठी ११ मापदंड निश्चित केले आहेत. या मापदंडांच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या टेरर फंडिंग प्रकरणांची तपासणी केली असता यापैकी १० मापदंडांचे पालन करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानची ग्रे यादीतून काळ्या यादीत घसरण झाली आहे. APG  च्या निर्णयामुळे पाकिस्तानवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. एफएटीएफच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकीत पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of